श्री. देवी वराठी मंदिर

श्री. देवी वराठी ही परुळे गावची ग्रामदेवता आहे. माहेरवासिनींच्या नवसाला पावणारी म्हणुन या देवीची ख्याती आहे. श्री. देवी वराठीचे मंदीर कौलारु आहे व समोर प्रशस्त सभामंडप आहे. काळ्या पाषाणातील महिषासुरमर्दिनी च्या रुपातील मुर्ती आहे. ही मुर्ती अष्टभुजा आहे. मंदिरातील जत्रोत्सवाचा दिवस सर्वांच्या विचारानुसार ठरविला जातो. येथे होळीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. दरवर्षी ५ मे रोजी देवीचा वर्धापनदिन सोहळा संपन्न होतो. दसरोत्सव हा देखील येथील मुख्य उत्सव आहे. 

▲ Top
Hotel - This is a contributing Drupal Theme
Design by WeebPal.