यशोगाथा

वेंगुर्ले तालुक्‍यातील ३२ वाडयांचा सर्वात मोठा गाव ‘परुळेबाजार’. माडा सुपारीच्‍या बागांनी समृध्‍द, वेंगुर्ले तालुक्‍याचे उत्‍तरेकडील शेवटचे टोक, मालवणलाही जवळ असा मध्‍यवर्ती ठिकाणी वसलेला परुळेबाजार गाव. तालुक्‍याचे मुख्‍य ठिकाण वेंगुर्ले पासून ३० किमी, कुडाळ पासून २३ किमी, मालवण पासून अवघ्‍या १५ किमी. अंतरावर अशा मध्‍यवर्ती ठिकाणी परुळेबाजार गाव वसलेले आहे. गावाच्‍या पुर्वेस कुशेवाडा गाव, पश्चिमेस कर्लीवाडी लागून कर्ली खाडी व अरबी समुद्र, उत्‍तरेस चिपी विमानतळ प्रकल्‍प, तर दक्षिणेस नयनरम्‍य, स्‍वच्‍छ व सुंदर किनारपट्टी लाभलेला भोगवे गाव असा हा परुळेबाजार गाव निसर्गाच्‍या कुशीत वसलेला आहे. परुळेबाजार गाव हे निसर्ग सुदंर असल्‍याने सिने सृष्‍ट्रीला त्‍याची भूरळ पडलेली आहे. ‘श्‍वास’ सारखा मराठी चिञपट परुळे गावामध्‍ये चिञित करण्‍यात आला व सदरचा चिञपट ऑस्‍कर मानांकन पर्यत भरारी मारली हे सर्वश्रृत आहे.

ग्रामजीवन –

गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय नारळ –सुपारी बागायती व भातशेतीचा आहे. शेतीला जोडधंदा म्हणुन दुग्ध व्यवसायाकडे लोक वळले आहेत. आंबा,काजु,कलम बागायतीही शेतक-यांच्या उत्पन्नाचे साधन आहे. रातांब्याचे पीक ही घेतात. तसेच निसर्गरम्य असलेल्या व खाडी किनारी वसलेल्या गावामध्ये पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातुन तरुण मंडळी व्यवसाय करत आहेत.

 

प्रसिद्ध श्रद्धास्थाने :

परुळेबाजार गावाच्‍या वैभवात भर घालणारी श्री. देव आदिनारायण, गौरी शंकर व पुरुषोत्‍तम, येसुआका, वराठी या सारखी मंदीरे प्रसिध्‍द आहेत. तसेच पांडव कालीन शिव मंदिर कोरजाई आनंदवाडी येथे आहे. श्री. देव वेतोबा ही गावाची प्रमुख ग्रामदेवता आहे.

कार्यक्षेत्र :

सन १९७३ पुर्वी संपूर्ण ३२ वाडयांची एक ग्रामपंचायत परुळेबाजार होती. परंतु प्रशासनाच्‍या दृष्‍ट्रीने १४ मे १९७३ रोजी गावाचे विभाजन होऊन चार ग्रामपंचायतीमध्‍ये रूपांतर झाले. त्‍यामध्‍ये परुळेबाजार, कुशेवाडा,भोगवे व चिपी या चार नविन ग्रामपंचायती स्‍थापन झाल्‍या. परुळेबाजार कार्यक्षेञात परुळे, कर्ली व गवाण ही तीन महसुल गावे आहेत. ग्रामपंचायतीची लोकसंख्‍या २५३१ एवढी आहे. त्‍यामध्‍ये पुरुष १०१५, स्‍ञीया १५१६ आहेत. गावचे क्षेञफळ ९६१.०२ चौ.हेक्‍टर एवढे आहे.

तंटामुक्त परुळे गाव :

“महात्मा गांधी तंटमुक्त गाव” योजनेच्या माध्यमातुन परुळेबाजार गावाने गावातील तंटे तंटामुक्त समितिच्या माध्यमातुन गावातच मिटवण्याचा धडक कार्यक्रम तंटामुक्त समितिने हाती घेतला. याचाच परिणाम म्हणुन सन २०१२/१३ मध्ये परुळे महात्मा गांधी तंटामुक्त गाव होण्याचा बहुमान व रु. ३ लाखाचे पारितोषिक ग्रामपंचायतीने पटकावले आहे. गावात मोठ्या प्रमाणावर धार्मिक उत्सव, सण , यात्रा, कला, क्रिडा स्पर्धा पार पाडल्या जातात. वरील प्रकारात कोणत्याही प्रकारचे वाद निर्माण न होता तंटामुक्त समितिच्या माध्यमातुन शांततेत पार पाडतात. तसेच विविध सामाजिक कार्यक्रम तंटामुक्त समितिच्या सहकार्याने होत असतात. यामध्ये विद्यार्थी गुणगौरव, शैक्षणिक मार्गदर्शन, शैक्षणिक साहित्य वाटप, आरोग्य शिबिरे, नेत्र तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर,मोफत चष्मे वाटप, लहान मुले व महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे आदि उपक्रम तंटामुक्त समिती, युवक मंडळे, ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने राबविले जातात .

 

 

योजना :

पर्यावरणाचे संवर्धन व जतन हि काळाची गरज आहे. पर्यावरणाच्या असंतुलनामुळे आज जगापुढे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. याबाबत जागृती करण्यासाठी ग्राम विकास खाते महाराष्ट्र शासनाने पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना तयार केली यातुन समृध्द संतुलितगावाची निर्मिती होईल.

ग्रामपंचायत परुळेबाजारने पर्यावरण संतुलित ग्राम समृध्‍द योजनेंतर्गत तसेच शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत ग्रामपंचायत हद्दीत सन २०११-१२ साली २५३८२०१२-१३ साली १७८६, सन २०१३/१४ साली २८२१ एवढी झाडांची लागवड करणेत आली व ती लावून जगविणेत आली आहेत. सन २०१२/१३ साली १०० टक्‍के घरपट्टी व पाणी पट्टी वसुली करणेत आली. सन २०१३/१४ साली घरपट्टी ९६ % तर पाणीपट्टी १०० % वसुल केली आहे.

महाराष्ट्र शासनाने पर्यावरण रक्षणासाठी सुरु केलेल्या पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजनेतुन वृक्ष लागवड, पर्यावरण रक्षण, वृक्ष सवर्धन, जंगलाचे सवर्धन यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्याच माध्यमातुन राज्यातील ग्रामपंचायतीनी गावात विविध उपक्रम राबवित आहे. याच माध्यमातुन परुळेबाजार ग्रामपंचायतीनेही पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजनेअंतर्गत वृक्ष लागवड, पर्यावरण रक्षण, वृक्ष सवर्धन, उर्जा बचत, विज बचत, इंधन बचत, बायोगँस या योजना यशस्वीपणे राबवल्या आहेत. या योजनेतुन ग्रामपंचायतीने गावातील ४९२ कुटुंबाना विज बचतीचा संदेश देणा-या CFL बल्ब चे वाटप केले. तसेच गावातील स्‍ट्रीट लाईटला CFL बल्‍प लावण्‍यात आलेले आहेत. गावामध्‍ये ४८ सौरपथदिप ग्रामपंचायत फंड, पर्यावरण निधी, तेरावा वित्‍त आयोग, जि.प /पं.स सदस्‍य निधी, आमदार निधी / खासदार निधी विविध योजनेतून बसविणेत आलेले आहेत.

सध्या आपल्याला भेडसवणारा प्रमुख प्रश्न आहे तो म्हणजे प्लँस्टीकचा अमर्यादीत वापर त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. प्लँस्टीक हा असा घटक आहे की त्याचे विघटन होत नाही. त्यामुळे तो पर्यावरणास हानिकारक आहे. याचा वापर टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने ग्रामसभेमार्फत ५० मायक्राँनपेक्षा कमी जाडीच्या प्लँस्टीक पिशव्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. प्लँस्टीक पिशव्यांचा वापर कमी करण्यासाठी बचतगटांना कापडी तसेच कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. ग्रामपंचायतीने “प्लँस्टीकचा वापर टाळा पर्यावरणाचे रक्षण करा” असा संदेश देणा-या कापडी पिशव्यांचे वाटप गावातील ४९२ कुटुंबाना करण्यात आले आहे.

 ग्रामपंचायतीला सन २००८ मध्ये निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला आहे. त्यापुर्वी शासनाच्या योजनेतुन ग्रामस्थांचे प्रबोधन करुन घरोघरी शौचालय बांधण्या बाबत मार्गदर्शन केले. गरीब कुटुंबाना एक सिमेंट पोते व एक संडासचे भांडे देऊन शौचालय बांधण्यास प्रवृत्त केले. त्याचा परीणाम म्हणुन गावात शौचालय बांधण्याबाबत जनजागृती होउन गावाला निर्मल ग्रामपुरस्कार मिळण्यास मदत झाली. याकामी तात्कालीन सरपंच श्री. उदय राजाराम दाभोलकर, उपसरपंच श्री. पुरुषोत्तम वासुदेव प्रभु, ग्रा.पं. सदस्य, ग्रामसेवक डी.जी.आंबेरकर यांनी विषेश प्रयत्न केले. याकामी त्यांना माजी जि.प. सदस्य श्री. निलेश सामंत, वेंगुर्ले पं.स. माजी सभापती श्री. सुनिल म्हापणकर यांचे सहकार्य लाभले.

परुळेबाजार ग्रामपंचायतीला सन २०११ मध्ये पर्यावरण विकासरत्न पुरस्कारही मिळाला आहे. ग्रामपंचायतीचे नुतन सरपंच श्री. प्रदिप वासुदेव प्रभु, उपसरपंच श्री. प्रणिती पांडुरंग आंबडपालाकर, ग्रा.पं. सदस्य यांनी कारभार स्विकारल्यानंतर गावधुरमुक्त करण्यासाठी सुरु केलेल्या अभियानाचा श्रीगणेशा स्वत:सरपंच श्री. प्रदिप वासुदेव प्रभू यांनी स्वत: बायोगँस बांधुन केला. बायोगँसचे महत्व लोकांना पटावे व ते शेतक-यांनी आत्मसात करावे यासाठी झाराप येथिल डाँ. प्रसाद देवधर यांच्या भगिरथ प्रतिष्ठानच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत परुळेबाजारने ग्रामस्थांना विनामुल्य मार्गदर्शन व प्रशिक्षण उपलब्ध करुन दिले. गावातील पशुधन धारक शेतक-यांच्या गृहभेटी घेऊन घरातील महीलांना बायोगॅसचे महत्व पटवून देण्यास सुरुवात केली. त्याचाच परिणाम म्हणुन गावात ग्रामस्थ बायोगॅस बांधण्यास प्रवृत्त झाले आणि एकाच वर्षी गावात २५ बायोगॅस बांधण्याचे उद्दीष्ठ सहजरीत्या गाठले. आतापर्यत ग्रामपंचायत हद्दीत ५२ शेतक-यांनी बायोगॅस बांधून पुर्ण केलेला व सध्‍या कार्यरत आहेत. बायोगँस बांधण्याचे प्रमाण वाढल्याने गावातील जंगलांचे संवर्धन होत आहे, वृक्षतोड कमी झाली. बायोगँस साठी शेण लागत असल्याने पशुपालनाकडे ग्रामस्थांचा कल वाढला. पर्यायाने दुग्धोत्पादनात वाढ झाली आहारात दुधाचा वापर होऊ लागला. ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यात बायोगॅस बांधकामाची फार मोठी मदत झाली. याकामी वेंगुर्ले पंचायत समितीतील ग.वि.अ. श्री. टी.बी. जाधव, विस्तार अधिकारी श्री. बी.आर. वायंगणकर, कृषी अधिकारी संजय गोसावी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. या करीता गावातील गरीब व गरजु शेतक-यांना ग्रामपंचायती मार्फत बायोगँस बांधण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान म्‍हणून रक्‍कम रुपये ५०००/- प्रती लाभार्थी देण्याचा महत्वपुर्ण निर्णय ग्रामापंचायतीने घेतला आहे. गावातील विधवा, निराधार, परीतक्त्या,गरीब गरजु महिलांना ५२ निर्धुर चुलींचे वाटप करण्यात आले. असा उपक्रम राबवून वरील प्रकारच्या महिलांना मदतीचा हात दिला. सदरील चुलीचा वापर केल्यामुळे धुराची फार कमी प्रमाणात निर्मिती होत असल्यामुळे महिलांचे आरोग्य व राहणीमान सुधारण्यास मदत झाली.

ग्रामपंचायतीने १५% मागासवर्गिय निधीतुन सन २०१३/१४ मध्ये उर्जाबचतीसाठी प्रेशर कुकर वाटप करण्यात आहे. २८८ लाभार्थ्यांना प्रेशर कुकरचे वाटप करण्यात आले. त्यामुळे इंधनाची बचत होण्यास फार मोठी मदत झाली आहे.

दरवर्षी १ जुलै हा दिवस कृषीदिन म्हणून ग्रामपंचायत हद्दीत साजरा केला जातो. या दिवशी गावातील सर्व शाळांतील विद्यार्थांना झाडांचे वाटप करण्यात येते ज्यामुळे विद्यार्थांमध्ये निसर्गाशी जवळीक, आपुलकी निर्माण होऊन भविष्यातील पर्यावरण विषयक समस्यांवर मात करता येईल. याची काळजी ग्रामपंचायती मार्फत घेण्यात येते. तसेच यादिवशी शाळेतील मुलांमार्फत वृक्षदिंडी काढुन गावात पर्यावरण विषयक जनजागृती करण्यात येते व शाळेमध्ये पर्यावरण विषयावर निबंध स्पर्धा भरवून बक्षिसे देण्यात येतात. तसेच शासकीय जागेमध्ये झाडांची लागवड करण्यात येते.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजनेअंतर्गत रोपवाटीका तयार करण्यात येतात त्यामध्ये वाढविलेल्या वृक्षांचे गावात ग्रामस्थांना आवळा, कोकम, शेवगा,साग, चिकू कलम रोपांचे वाटप करण्यात येते. गावातील पडीक जमिनीवर शेतक-यांमार्फत त्याची लागवड मोठ्याप्रमाणावर होते. पर्यावरण ग्रामसमृध्दी योजनेतुन तसेच शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत ग्रामस्थांनी चालु वर्षात २६८० एवढी वृक्षलागवड केली त्याची नोंद ग्रामपंचायत दप्तरी ठेवण्यात आली आहे. एकंदरीत पर्यावरण समृद्धी योजनेअंतर्गत गावात विविध उपक्रम राबविले जात आहेत.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये गांडुळ खत निर्मीती प्रकल्प ही वैयक्तीक लाभाची योजना शेतक-यांनी घेऊन मोठ्याप्रमाणात गांडुळ खताचीनिर्मीती करण्यात येते. त्याचा वापर शेतकरी शेतात करतात त्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत झाली आहे. तसेच सेंद्रिय खताचा शेतात वापर करण्यास सुरुवात झाली. याचा परिणाम रासायनिक खतांचा शेतात कमी वापर होत आहे. त्यामुळे जमिनीतील पोषक बॅक्टेरिआ ची वाढ होत आहे.

पाणी अडवा पाणी जिरवा

गावातील लोकसहभागाचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातसन २०१३

aajpewadi_bandhara.jpgमध्ये जिल्हास्तरावर व्दीतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवुन भरीव यश मिळविले आहे. याकामात गावातील ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे. या एप्रिल-मे महिन्यातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी गावातील ओहोळावर नोव्हेंबर महिन्याच्या सुरवाती पासुन वनराई बंधारे बांधण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न करुन यावर्षी २४ बंधारे बांधले व पाणी अडविल्याने उन्ह्याळ्यात पाण्याची कमतरता जाणवली नाही. परीसरातील विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. गावात वनराई बंधारे शाळेचे विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, शेतकरी, महिला बचतगट यांच्यामार्फत श्रमदानातुन बांधण्यात येतात. बंधारे बाधल्यामुळे पाणी टंचाई गावात भासत नाही. त्यामुळे गाव टँकरमुक्त करणेत ग्रामपंचायतीला यश आले आहे.

ग्रामपंचायत परुळेबाजार यशस्वी वाटचाल करीत गावाला अनेक पुरस्कार मिळवून दिले आहेत. ग्रामपंचायतीला नुकताच महात्मा गांधी तंटामुक्त गाव हा सन्मानही प्राप्त झाला आहे. गावात सौरउर्जेचा वापर करुन सौरपथदीप बसविले आहेत. सौरकंदिल योजनेचाही लाभ देण्यात येत आहे. ग्रामपंचायतीला सन २०१२/१३ यावर्षी जिल्ह्यातील चौथे “लोकराज्य ग्राम” बनण्याचामान मिळाला. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. नारायणरावजी राणे साहेब यांच्याशुभहस्ते ग्रामपंचायतीला “लोकराज्य ग्राम” पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शासनाचे मुखपत्र असलेले मासिक “लोकराज्‍य” गावातील घराघरात पोहोचत आहे. शासनाच्या विविध योजनांची माहीती त्यामुळे ग्रामस्थांना होत आहे. पर्यायाने गावातील नागरीक शासनाच्या विविध धोरणांबाबत जागरुक होत आहेत.

 

ग्रामसभा बळकटीकरण

ग्रामपंचायतीच्या मासिक सभा नियामानुसार वेळेत व जास्तीत जास्त सदस्यांच्या उपस्थितीत पार पाडल्या जातात. तसेच ग्रामसभेच्या अगोदर वॉर्डसभाlarge_graamsbhaa_2.jpg ,महिला ग्रामसभा घेण्यात येते.ग्रामपंचायतीने गावात शासन नियमाप्रमाणे नियमित ग्रामसभा घेण्यात येतात. तसेच आवश्यकता वाटल्यास खास ग्रामसभा घेण्यात येते. प्रत्येक ग्रामसभेला गावातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित असतात. गावातील सर्वच विकासकामांसंदर्भात ग्रामस्थांना विचारात घेऊन पारदर्शक कारभार केला जातो. ग्रामसभेत प्रत्येक ग्रामस्थांच्या मताचा विचार केला जाऊन एकमताने निर्णय घेण्यात येतो. गावातील महिलांचा ग्रामसभेमध्ये विशेष सहभाग असतो. विविध शासकिय योजनांची माहीती ग्रामसभेत देण्यात येते. लाभार्थी निवड करणे, विविध समिती स्थापन करणे, जमा –खर्च वाचन करणे, सामाजिक अंकेक्षणxlarge_mhilaa_graamsbhaa.jpg करणे, गाव पातळिवरील समित्यांचा जमा-खर्चाचा आढावा घेणे, माहितीच्या अधिकारासंदर्भात माहिती देणे, पाणिपुरवठ्याचे नियोजन करणे, विकास आराखडा तयार करणे, वार्षिक अहवाल वाचन करणे इ.विषय ग्रामसभेमध्ये हाताळले जातात. प्रत्येक ग्रामसभा यशस्वीरित्या पुर्ण केली जाते. प्रत्येक ग्रामसभेची सुचना एस.एम.एस व्दारे तसेच स्पीकर व्दारे दवंडी देवून ग्रामस्थांना देण्यात येते. राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानातही केंद्रीय स्तरावर ग्रा.पं. परुळेबाजारने यश मिळवलेले आहे.केंद्रिय समितितील रिचा माथुर व भारती पाटिल यांनी ग्रामपंचायतला भेट देवुन पाहणी केली होती. त्यानी आपला अहवाल केंद्राला सादर केल्यानंतर ग्रा.पं. परुळेबाजारला राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानात यश मिळवित केंद्राचे ८ लाख रुपयाचे बक्षिस मिळविले आहे. तसेच सन २०१२/१३ सालच्‍या संत गाडगेबाबा ग्राम स्‍वच्छता अभियानामध्‍ये ग्रामपंचायतीने जिल्‍हा स्‍तरावर दुसरा क्रमांक मिळविला आहे तर कर्ली अंगणवाडीचा साविञीबाई स्‍वच्‍छ अंगणवाडी हा कोकण विभाग स्‍तरावरील पुरस्‍कार नुकताच जाहीर झाला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीने गांडुळ खत प्रकल्प, वैयक्तिक सिंचन विहिरी, फळबाग लागवड,वैयक्तिक शौचालय, शोषखड्डे इत्‍यादी योजना देशातील तळागाळात म्‍हणजे गावामधील लाभार्थिना लाभ दिलेला आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात ग्रामपंचायतीची विभाग स्तरावर निवड झालेली आहे.

 

 गावातील शैक्षणिक सुविधा व इतर सुविधा

गावात परुळेबाजार, कर्ली, गवाण, आनंदवाड या ४ प्राथमिक शाळा, ४ अंगणवाडी, २ आरोग्य उपकेंद्र परुळे, कर्ली आहेत. गावात स्टेट बॅक ऑफ इंडिया, बॅक ऑफ महाराष्ट्र, या राष्ट्रीयकृत बॅका, तसेच सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बॅक कार्यरत आहे, पोस्ट ऑफिस परुळे, दुरध्वनी केंद्र आहे. पशुवैद्यकीय दवाखाना आहे. वाचकांची वाचनाची आवड जोपासणारे “ महालक्ष्मी ज्ञानवर्धीनी वाचनालय “ आहे. वाचनालयाला “ब” दर्जा मिळालेला आहे. परुळे युवक कला क्रिडा मंडळ, संस्कृती कला प्रतिष्ठान व सातेरी कला क्रिडा मंडळ गावात विविध समाजपयोगी उपक्रम ग्रामपंचायतच्या सहकार्यातून राबविले जातात. 

नरेगातुन रोजगार निर्मिती :

महाराष्ट्र ग्रामिण रोजगार हमी योजनेतुन नोंदणीकृत १२२ कुटुंबांना रोजगार निर्मिती झालेली आहे. सदरील योजनेंतर्गत शेतकरी व महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. 

 

ग्रामसचिवालय –:

ग्रामपंचायत परुळेबाजार कार्यालय बांधणेसाठी जनसुविधा व राष्ट्रीय ग्रामस्वराज्य योजना व स्वनिधी योजनेतुन प्रशस्त अशी ग्रामसचिवालय इमारत उभी राहत आहे.तिचे काम पुर्ण होत आले आहे. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये संगणक बसविण्यात आले असुन ग्रामस्थांना सर्व प्रकारच्या दाखल्यांचे वितरण संगणकिय संग्राम केंद्रातुन वितरण करण्यात येत आहे.

पाणिपुरवठा -:

गावात बहुतांश ग्रामस्थांच्या वैयक्तीक विहीरी आहेत. तसेच नळ योजना परुळे, गवाण, कर्ली येथुन २५० कुटुंबाना खाजगी नळ कनेक्शन मधुन पाणीपुरवठा केला जातो गावात २१ सार्वजनिक विहीरी असुन ५ बोअरवेल आहेत. पाण्याचा साठा मुबलक आहे. गावामध्ये टंचाई सदृष्य परिस्थिती निर्माण होत नाही.

महिला बचत गट -:

परुळेबाजार ग्रा.पं.कार्यक्षेत्रात एकुण २५ बचत गट असुन बचत गटाच्या माध्यमातुन महिला सक्षम होत आहेत. सर्व महिला बचत गटातिल महिला विविध प्रशिक्षणे, माहिती च्या माध्यमातुन स्वयंपुर्ण होत आहेत. परुळे कर्लीवाडी येथील “ सिध्दी स्वयंसहायता बचत गटाला” उत्कृष्ट बचत गटाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळाला आहे. बचतगट काथ्याव्यवसाय करित आहेत. बचत गटातिल महिला “न्याहरीनिवास केंद्रामध्ये” जेवण बनविण्यचे काम करुन आपली आर्थीक उन्नती साधत आहेत. बचत गटाच्या महिला फणसापासुन वेफर्स तयार करणे, कुक्कुटपालन, कॅटरिंग आदी व्यवसायाच्या माध्यमातुन रोजगाराचे साधन उपलब्ध करित आहेत. बांबुपासुन विविध टिकाऊ वस्तु तयार करणे हे काम करतात . राजमाता जिजाऊ कुपोषण मुक्त ग्राम अभियान महाराष्ट्र राज्याच्या गावपातळीवरील पहिला कार्यक्रम करण्याचा मान परुळेबाजार ग्रामपंचायतीला मिळाला आहे. येथील अंगणवाडीला राजमाता जिजाऊ कुपोषण मुक्त अभियान अंतर्गत पुरस्कार मिळाला आहे.

नाविण्यपुर्ण उपक्रम :-

परुळेबाजार ग्रामपंचायतीने एकाच वेळी ७००० हजार लोकांना आधारकार्ड काढुन दिले. परुळेबाजार ग्रामपंचायतीने सन २०१५ सालात स्वत:ची दिंनदर्शिका प्रकाशित करुन वेगळा उपक्रम राबविला. यात सर्व माहिती संकतील करुन ग्रामस्थांना उपयोगी पडेल असा उपक्रम राबवला. परुळेबाजार येथे राज्यस्तरीय दशावतारी नाटयमहोत्सवाच्या माध्यमातुन नाटय रसिकांना दर्जेदार दशावतारी नाटकांचा आस्वाद घेता येतो. परुळे युवक कला क्रिडा मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धा घेण्यात येतात.

विमानतळ प्रकल्पामुळे परुळेबाजार गावाच्याविकासाला गती -:

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विमानतळाचा प्रकल्प परुळेबाजार ग्रा.पं.कार्यक्षेत्रात साकारत आहे. या प्रकल्पा नंतर परुळेबाजारचा विकासात्मक कायापालट होणार आहे.पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.बचत गटांना रोजगाराच्या संधी जिल्ह्यातील अनेक तरुण आज लघुउद्योग तसेच प्रक्रिया उद्योगाकडे वळत आहे त्याला विमानतळ प्रकल्पामुळे फायदा होईल.

 

ग्रामपंचायत परुळेबाजारच्या यशस्वी वाटचालीत गावातील लोकांचा सहभाग, तसेच वरीष्ठ अधिकारी मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी img_6448.jpgरेडकर साहेब, गटविकास अधिकारी जाधव साहेब, विस्तार अधिकारी केरवडेकर साहेब, वायंगणकर साहेब, कृषी अधिकारी गोसावी साहेब, बागायतकर साहेब, सावंत साहेब यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे. सरपंच म्हणुन कार्यभार स्वीकारल्यानंतर दोन वर्षात २८ लाख रुपायांची पारितोषिके मिळविलेली आहेत. सरपंच श्री.प्रदिप प्रभू यांच्या संकल्पनेतील आदर्श शाळा परुळे नं.३ च्या रुपाने आकार घेत आहे. या शाळेत बोलक्या भिंती, किचन शेड, बायोगॅस ,गांडूळखत प्रकल्प असे प्रकल्प साकारत आहेत. हि शाळा आदर्श शाळा करण्याचा त्यांचा मानस आहे. आणि गावच्या विकासाच्या योजना राबविताना जि.प. मधील पं.स. मधील अधिका-याचे बहुमोल मार्गदर्शन व गावातील ग्रामस्थ व गावपातळी वरिल कर्मचा-याचे सहकार्यामुळेच गावचा विकास करु शकलो हे सांगावयास सरपंच श्री.प्रदिप प्रभू कधीच विसरत नाही.   

▲ Top
Hotel - This is a contributing Drupal Theme
Design by WeebPal.