श्री.देव वेतोबा

वेंगुर्ले तालुक्यातील परुळे गावचे ग्रामदैवत असलेले श्री.देव वेतोबा चे मंदिर कुशेवाडा येथे आहे. मंदीर जुन्या पद्धतीचे कौलारु आहे. श्री.देव वेतोबाची मुर्ती काळ्या पाषाणातील आहे. दगडी विटेवर उभी,डोक्यावर शेषस्वरुप जाळ, कानात रुद्राक्ष मुद्रिका, दोन्ही हातांचे दंडांस सर्पाकृती, उजव्या हाती उभी तलवार, उजव्या हाती कंकण व अंगठी,डाव्या हातात तिर्थकुंड, गळ्यात यज्ञोपवित, वारुड माळा व दगडी पद्महार, कमरेभोवती दगडी विणलेला गोफ, दोन्ही मांड्यांवर सर्पाचे वेस्टन, डोळे व कल्ले चांदीचे, पायात पादुका पितळी व चांदीच्या. श्री. देव वेतोबा भाविकांचे श्रद्धास्थान आहे. श्री.देवी भावई, श्री.देव रवळनाथ ही मंदिरे या परिसरात आहेत. तसेच श्री. मुंडयेवस, प्रभुवस,मडवळवस आदि मंदीरे आहेत. श्री. देव वेतोबा देवस्थानचा दसरोत्सव व त्यानंतर श्री.कुलस्वामिनी मंदीर कोंडसवाडी येथे बाक लावणे हे मोठे उत्सव येथे संपन्न होतात. तसेच आषाढ शुद्ध एकादशी जागर,श्रावण सोमवार, श्रावण शु.पौर्णिमा,गालड्या टोपणे जागर, गोकुळाष्टमी, अश्विन शु, प्रतिपदा(घटस्थापना), अश्विन शु, अष्टमी ,नवमी,द्वादशी,(तुळशी विवाह) दादरे,गुढीपाडवा,रामनवमी,तसेच १ मे रोजी वर्धापनदिन साजरा कारण्यात येतो.  

▲ Top
Hotel - This is a contributing Drupal Theme
Design by WeebPal.