श्री.देव आदिनारायण विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमीटेड
परुळेबाजार ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात श्री.देव आदिनारायण विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमीटेड ही सहकारी संस्था कार्यरत आहे.या संस्थे व्दारे शेतका-यांना कर्ज रोखे शेतीसाठी खत पुरवठा करणे आदि उपक्रम राबवले जातात.तसेच सोसाटी मार्फत रास्त दराचे धान्य दुकान व रॉकेल विक्री केंद्र चालविले जातात.सध्या या सोसायटीचे चेअरमन म्हणुन श्री.विश्वनाथ विठ्ठल घोलेकर व इतर सहकारी सदस्य कार्यभार सांभाळत आहेत. सचिव म्हणुन श्री.सावंत कार्यभार सांभाळतात.
परुळे युवक कला क्रिडा मंडळ
परुळे युवक कला क्रिडा मंडळ परुळेगावच्या सामाजिक उपक्रमांत अग्रेसर असतात. मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रम आरोग्य शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रिडा स्पर्धा या सारखे उपक्रम सातत्याने राबवित असते. तसेच मंडळाचा महिला विभाग गावातिल महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम आरोग्य शिबिरे, क्रिडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, राबवितात.
संस्कृति कला प्रतिष्ठान परुळे व सातेरी कला क्रिडा मंडळ कर्लीवाडी
गावात संस्कृति कला प्रतिष्ठान परुळे व सातेरी कला क्रिडा मंडळ कर्लीवाडी यांच्यातर्फे राज्यस्तरिय एकांकीका स्पर्धा , राज्यस्तरिय दशावतारि नाट्य महोत्सव, भव्य क्रिकेट स्पर्धा,शैक्षणिक मार्गदर्शन शिबिरे घेतली जातात. माध्यमातुन नाटय रसिकांना दर्जेदार दशावतारी नाटकांचा आस्वाद घेता येतो.
श्री.महालक्ष्मी वाचनालय व ग्रंथसंग्रहालय
ग्रामपंचायत परुळेबाजार कार्यक्षेत्रात श्री.महालक्ष्मी वाचनालय व ग्रंथसंग्रहालय वाचकांच्या सेवेत कार्यरत आहेत. वाचनालयात १५,०००/- विविध विषयांवरची पुस्तके उपलब्धआहेत. गावातील विविध सामाजिक उपक्रमात वाचनालयाचा सहभाग असतो.