१ |
श्रेया श्रीधरचव्हाण |
२ |
माधुरी मारुती चव्हण |
३ |
शालीनी श्रीधर चव्हाण |
४ |
माधवी महादेव चव्हाण |
५ |
सुलोचना शिवराम चव्हाण |
६ |
सुप्रिया सुरेश चव्हाण |
७ |
वनिता भगवान परुळेकर |
८ |
बचतगट
परुळेबाजार ग्रा.पं.कार्यक्षेत्रात एकुण २५ बचत गट असुन बचत गटाच्या माध्यमातुन महिला सक्षम होत आहेत. सर्व महिला बचत गटातिल महिला विविध प्रशिक्षणे, माहिती च्या माध्यमातुन स्वयंपुर्ण होत आहेत. परुळे कर्लीवाडी येथील “ सिध्दी स्वयंसहायता बचत गटाला” उत्कृष्ट बचत गटाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळाला आहे. बचतगट काथ्याव्यवसाय करित आहेत. बचत गटातिल महिला “न्याहरीनिवास केंद्रामध्ये” जेवण बनविण्यचे काम करुन आपली आर्थीक उन्नती साधत आहेत. बचत गटाच्या महिला फणसापासुन वेफर्स तयार करणे, कुक्कुटपालन, कॅटरिंग आदी व्यवसायाच्या माध्यमातुन रोजगाराचे साधन उपलब्ध करित आहेत. बांबुपासुन विविध टिकाऊ वस्तु तयार करणे हे काम करतात . राजमाता जिजाऊ कुपोषण मुक्त ग्राम अभियान महाराष्ट्र राज्याच्या गावपातळीवरील पहिला कार्यक्रम करण्याचा मान परुळेबाजार ग्रामपंचायतीला मिळाला आहे.