ग्रामगीतेतील स्वच्छता विचार

मी समजतो गावहि शरिर । त्यास राखावे नेहमी पवित्र ।

त्यानेच नांदेल सर्वत्र । आनंद गावी ॥

जैसे आपण स्नान करावे । तैसेे गावहि स्वच्छ ठेवित जावे ।

सर्वचि लोकांनी झिजुनि घ्यावे । श्रेय गावाच्या उन्नतीचे ॥

आपण तेवढे स्वच्छ राहावे । भोवती गलिच्छ वातावरणचि पाहावे ।

याने सुमंगलता कधी न पावे । तन,मन होई दुषित ॥

मिळोनि करावी ग्रामसफाई । नाली, मोरी ठायी ठायी ।

हस्ते परहस्ते साफ सर्वहि । चहुकडे मार्ग ॥

त्यात जी जी निघेल घाण । ती दुर न्याची गावापासुन ।

अस्ताव्यस्त न देता फेकुन । नीट व्यवस्था लावावी ॥

ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिति दर्शवणारे प्रपत्र

रोप वाटप

शासनाच्या पर्यावरण संतुलित समृद्धग्राम योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप करण्यात  आले.

▲ Top
Hotel - This is a contributing Drupal Theme
Design by WeebPal.