Carousel

गावची मुख्य उत्पादने

Tags: 

राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण पुरस्कार

यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कार

नियोजीत विमानतळ प्रकल्प

विमानतळ प्रकल्पामुळे परुळेबाजार गावाच्याविकासाला गती -:

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विमानतळाचा प्रकल्प परुळेबाजार ग्रा.पं.कार्यक्षेत्रात साकारत आहे. या प्रकल्पा नंतर परुळेबाजारचा विकासात्मक कायापालट होणार आहे.पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.बचत गटांना रोजगाराच्या संधी जिल्ह्यातील अनेक तरुण आज लघुउद्योग तसेच प्रक्रिया उद्योगाकडे वळत आहे त्याला विमानतळ प्रकल्पामुळे फायदा होईल. 

Tags: 

श्री. देव आदिनारायण मंदिर

परुळे येथील ऐतिहासिक देवस्थान म्हणजे श्री. देव आदिनारायण. हे मंदिर सुमारे साडेसातशे वर्षांपुर्वीचे आहे. जगातील केवळ दोन प्राचीन सुर्यमंदिरांपैकी एक म्हणजे श्री. देव आदिनारायण मंदिर होय. मुर्ती व देवालय पश्चिमाभिमुख आहे. ही मुर्ती काळ्या पाषाणातील आहे. देवांचे वाहन रथ आहे. त्यामुळे रथसप्तमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. प्रशस्त सभामंडप, सुसज्ज भक्तनिवास अशी व्यवस्था देवस्थानने केली आहे. इथे नेहमी भाविकांची वर्दळ असते. 

आमची शाळा

सरपंच श्री.प्रदिप प्रभू यांच्या संकल्पनेतील आदर्श शाळा परुळे नं.३ च्या रुपाने आकार घेत आहे. या शाळेत बोलक्या भिंती, किचन शेड, बायोगॅस ,गांडूळखत प्रकल्प असे प्रकल्प साकारत आहेत. हि शाळा आदर्श शाळा करण्याचा त्यांचा मानस आहे.

▲ Top
Hotel - This is a contributing Drupal Theme
Design by WeebPal.